टॉप बातम्या

वणी नगर परिषद निवडणूक : प्रचार तापला, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आज शिगेला पोहोचत असून शहरात निवडणुकीची जोरदार लगबग दिसू लागली आहे. म’वि’आ’चे उमेदवार विजयानजीक पोहोचत असल्याचे ढोल राजकीय वर्तुळात जोरात वाजू लागले आहेत. बदलाची ओळख असलेल्या वणी शहरात यावेळी "निश्चित बदल" होणार असल्याची चर्चा अधिक जोमाने रंगू लागली आहे.

थेट नगराध्यक्ष पदासह 29 नगरसेवक पदांच्या लढतीत सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात ठामपणे उभे ठाकले आहेत. निवडणुकीस अवघे काहीच दिवस उरले असताना सभा, गाठभेटी, कॉर्नर सभा आणि जनसंवादाच्या माध्यमातून सर्वच पथकांकडून मतदारांशी संवाद साधला जात आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या प्रचाराला युवा, महिला, जेष्ठ नागरिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शहरात निर्माण झालेलं वातावरण आघाडीच्या बाजूने झुकत चालल्याचंही ते सांगतात.

विशेष म्हणजे, डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) यांची निवडणूकीचा बिगुल वाजल्यापासूनच लोकप्रिय आणि विजयी उमेदवार म्हणून चर्चेत राहिल्या असून त्यांच्यावरील नागरिकांचा वाढता विश्वास पाहता त्यांना पराभूत करणे व आघाडी उमेदवारांना प्रतिस्पर्ध्यांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

वणीतील हा रंगतदार प्रचार आणखी कोणते वळण घेतो, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();