सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
महायुतीचे सरकार सत्तेत असताना वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत मात्र युतीचे प्रमुख पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे कोणता कानमंत्र देतात, कोणता रणनितीचा मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वणी नगर परिषद निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून सर्व पक्षांकडून सभा-मेळाव्यांना वेग आला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून प्रचाराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उद्याच्या दौऱ्यामुळे वणीतील राजकीय वातावरण आणखी रंगणार आहे.