टॉप बातम्या

श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी शहरात श्यामा (मिस्त्री) उर्फ श्यामा नरेश संगमवार (४०) रा.राजूर (कॉ),ता.वणी,जि- यवतमाळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वणी शहरात लेथ मशीणवाले म्हणून त्यांची ओळख सर्वत्र होती. हसमुख स्वभाव, मदतीला तत्पर आणि सर्वांचे आपलेसे करणारा व्यक्तिमत्त्व अशा स्वरूपात त्यांची कायम ओळख होती.

मागील ५ दिवसाआधी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना वर्धा येथील सावंगी (मेघे) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्य वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();