सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वरोरा रोडवरील एस. बी. लॉन, वणी येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष बंडूजी कांबळे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख व्याख्याते म्हणून पद्मश्री मा. लक्ष्मण माने (माजी आमदार, उपाध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, सातारा) हे ‘लोकशाही प्रक्रियेतील संवैधानिक मूल्ये आणि वास्तविकता’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच मा. प्रा. डॉ. रमेश शंभरकर, विभागप्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर हे ‘धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधान’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.
या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणी प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांच्या वतीने करण्यात आले आहे.