टॉप बातम्या

प्रभाग २ व प्रभाग ८ मधील कॉर्नर सभांना गर्दीची उसळी!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी नगर परिषद निवडणुकीचे वातावरण भयंकर तापले असून प्रचाराला शिगोशीग भरून येत आहे. राजकीय समीकरणे बदलत असताना शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे “विकासाचे वचन, 5 नंबरचे बटण”.
आज प्रभाग 2 आणि 8 मध्ये नुकत्याच झालेल्या कॉर्नर सभांना नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रचाराला विशेष वेग मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन्ही सभांना प्रचंड गर्दी उसळली होती. या वेळी आमदार संजय देरकर, मनसेचे नेते राजू उंबरकर तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच 2 आणि 8 प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते.

सभेदरम्यान शहरातील महत्त्वाच्या मूलभूत समस्या, रस्त्यांची निर्बंधित अवस्था, वीज पुरवठ्यातील अडचणी, परिसरातील अस्वच्छता, आरोग्य, शिक्षण व्यवस्था तसेच सर्वाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी समस्या यावर सखोल चर्चा करण्यात आली. या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस भूमिका मांडण्यात आली असल्याने नगराध्यक्षा व त्यांची टीमला नागरिकांमध्ये सकारात्मकता वाढल्याचे दिसून आले.
नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे या सभा प्रभागात चांगल्‍याच चर्चेत राहिल्या आहेत. वाढते जनसमर्थन पाहता सध्या वणी शहरात एकच आवाज घुमताना ऐकू येत आहे.
“एकच विकासाचं वचन… पाच नंबरचं बटण!”


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();