सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : समाजहिताची नितांत जाण आणि विविध सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग यासाठी ओळख असलेल्या प्रशांत शामराव नक्षणे यांनी वणी नगरपरिषदेच्या नगरसेवकसाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात दमदार एंट्री घेतली आहे. निवडणूक जाहीर होताच त्यांनी प्रचाराची जोरदार सुरुवात केली असून सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रभाग क्र. 11(ब) मधील नागरिकांशी सातत्याने संपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर उपायांचे भक्कम आश्वासन देणे आणि विकासाचा नवा आराखडा मांडणे या माध्यमातून प्रशांत नक्षणे यांचा प्रचार घराघरात पोहोचत आहे.
त्यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता समर्थक अधिक जोमाने त्यांच्या पाठिशी उभे आहेत. ‘शिट्टी’ चिन्हासमोरील "बटण" दाबून प्रशांत नक्षणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी मतदारांना केले आहे.