टॉप बातम्या

महाविकास आघाडीचा दृढ संकल्पनामा आला... हुकमाचा एक्का टाकला, 'ही' आहेत प्रमुख वैशिष्ट्य

आदरणीय
होय हे आम्ही करणारच....
"वणीकर सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनो,
आपणास सर्वांना मानाचा मुजरा...!"

तब्बल आठ वर्षानंतर वणी नगर परिषदेची निवडणूक होत आहे. मागील सत्ताधा-यांनी वणीच्या सांस्कृतिक सामाजिक ऐतिहासिक गौरवशाली वैभवाची धुळधाण केली. वणी शहराला पुन्हा एकदा गौरवाचे वैभवाचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- महाराष्ट्र नवनिर्माण सेना-संभाजी ब्रिगेड - भीम आर्मी व मित्रपक्ष वणीकरांना ह्या दृढ संकल्पनामाद्वारे अभिवचन देतो की सुंदर स्वच्छ प्रदूषण मुक्त मूलभूत सुविधायुक्त व्यवस्था आणि दर्जेदार दैनंदिन नागरी सुविधा नियमितदेण्यासाठी कटीबद्ध आहो.

🌀दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी:
वणी शहरातील सर्व नगरपरिषद शाळेचे नूतनीकरण करून आधुनिक शिक्षण प्रणालीने प्रशिक्षित झालेले तज्ञ शिक्षक नेमून शाळेतुन गुणवत्ता पूर्ण दर्जेदार शिक्षण सर्व स्तरातील नागरिकांच्या पाल्यांना देण्याचा निर्धार त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गुणवंत संस्कारक्षम विध्यार्थी घडवण्याची हमी, सुंदर शाळा इमारती, डिजिटल वर्ग खोल्या आणि सर्व प्रकारच्या खेळांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे क्रीडांगणे व उद्याने निर्माण करू.

🌀नियमित पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्याची ग्वाही:
 कित्येक वर्षापासून शुद्ध पाण्यासाठी तहानलेल्या वणीकरांना शुद्ध पिण्याचे व वापराचे पाणी पुरवण्यासाठी कालबाह्य झालेली जलशुद्धीकरण यंत्रणा ताबडतोब बदलून नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी जल शुद्धीकरण यंत्रणा उभारू व अखंड शुद्ध पिण्याच्या पाण्याचा व वापराच्या पाण्याचा पुरवठा नियमित नागरिकांना देण्याची ग्वाही आम्ही देत आहो, सोबत शहरातल्या विविध भागात पाण्याचे स्त्रोत निर्माण करून पाऱ्याही पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याचा आमचा निर्धार आहे.

🌀आरोग्य सुविधा:
वणीकरांना आरोग्याच्या दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. शहरातील नगरपरीषदेच्या सहा UPHC व एक UHWC ह्या आरोग्य यंत्रणा सर्व वैधकीय सुविधांनी सुसज्ज करून नागरिकांना आरोग्य सेवा देऊ. वणी शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था देण्यासाठी विशेष लक्ष देऊ.

🌀सुरक्षा तिसरा डोळा (CCTV):
 वणी शहरातील प्रत्येक प्रभागात CCTV लाहून होणाऱ्या समाज विघातक घटना, चोरी, अपघात, छेडखानी, अपहरण, पलायन या सारख्या घटनावर नियंत्रण आणण्यासाठी तिसरा डोळा निरंतर कार्यान्वित ठेवू आणि वणीकरांना भयमुक्त करू.
तसेच रस्त्यावर मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथकाच्या नेमणूका करून त्यापासून होणारे धोके कायम संपवू

🌀WIFI सुविधा देण्याचा मानस:
युवकांना माहिती तंत्रज्ञानाचा विनामूल्य उपयोग घेण्यासाठी प्रत्येक प्रभागात मोक्याच्या ठिकाणी WIFI सुविधा उपलबध करून देऊ.

🌀नगर नियोजन:
 शहराची भविष्यातील होणारी भरमसाठ वाढ लक्षात घेता दिर्घकालीन दृष्टीकोण लक्षात घेऊन संकल्प पूर्ण विकासाचा नवीन आराखडा तयार करून कार्यान्वित करू.

🌀पट्टे वाटप व झोपडपट्टी विकास:
 गोरगरिबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे व झोपडपट्टीचे पुनर्वसन करून जनसामान्याचे जीवनमान सुधारणे आणि अतिक्रमण धारकांना नियमानुसार अतिक्रमणाच्या जागा नियमाकुल करून पट्टे वाटप लवकरच करण्याचे वचन सर्व नागरिकांना देत आहोत.

🌀आर्थिक विकास व रोजगाराच्या संधी:
 स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी MIDC आणि इतर ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग सुरू करण्यासाठी उद्यमशील होतकरू युवकांना शासनाकडून अर्थसाह्य जागा आणि मार्केट उपलब्ध करून रोजगारांच्या संधी निर्माण करून देण्याची हमी.

🌀स्वच्छ वणी सुंदर वणी:
 वणी शहरातील सर्वत्र पसरलेली रस्त्यावरील धुळ कचरा नियमितपणे साफसफाई करून स्ते धुळ मुक्त करून नवीन सुंदर मजबूत रस्ते तयार करू त्याकरता आवश्यक ती मशनरी तात्काळ उपलब्ध करून सफाई यंत्रणा नियमित कार्यान्वित ठेवु. संपूर्ण शहरात उपलब्ध जाग्यांवर देशी वृक्षारोपण करून वनराई फुलवून नागरिकांना मोकळा श्वास घेण्याची व्यवस्था लोकसभागातून निर्माण करू.

🌀फेरीवाले दुकाने:
 शहरातील विविध भागात तात्पुरते दुकाने लावून आपली उपजीविका करणाऱ्या फेरीवाले बांधव व रस्त्यावर बसणाऱ्या सर्व दुकानदारांना व्यवसाय करण्याची सुरक्षित संधी देण्याची व नाममात्र पट्टी आकारण्याची हमी हा आमचा शब्द देतो.

🌀सौंदरकरण:
शहरातील शिंगाडा तलावाचे भ्रष्टाचारामुळे रखडलेले सौंदर्यकरणाचे काम नव्याने सुरू करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित करू आनंद आणि मनोरंजनाची साधने लावून लवकरच लोकार्पण करू.

🌀अभ्यासिका कक्ष (वाचनालय): 
होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांकरीता नगरपरिषदेचे मार्फत सार्वजनिक वाचनालय व अत्याधुनिक अभ्यासिका केंद्र सुरू करून त्यात विविध स्पर्धा परीक्षा करिता सर्व विषयांच्या तज्ञांचे मार्गदर्शन वारंवार
देण्याची संधी उपलब्ध करून नामांकित विद्यार्थी घडवण्याचे वचन आम्ही देत आहोत.

🌀डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्याण मंडप व नाट्यगृह:
 आतापर्यंत सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराने दुर्लक्षित राहिलेलेडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील सभागृहाला सुशोभीकरण करून सुधारणा करून सामाजिक व जनतेच्या कार्यासाठी उपलब्ध करून देऊ तसेच नाट्यगृहात आवश्यकता अपूर्ण असलेल्या सुविधा ठेवून हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्य दालन खुले करू.

🌀सौर पथदिवे:
 शहरातील रस्त्यावरील पथदिवे स्ट्रीट लाईट सौरऊर्जवरती लाऊन विजेचा लंपनडाव संपवू.

🌀मलनिस्सारण:
 शहराचे विविध भागातून निघणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण भागात अवसादन टाकी (SEDIMENTATION TANK) बांधून दूषित पाणी निर्गुळा नदीत न सोडता फिल्टर करून नदी शुद्ध ठेवू व शहर दुर्गंधी दूर करू.

🌀सार्वजनिक स्वछता गृह:
 शहरातील गर्दीच्या ठिकाणी होणारी महिलांची व नागरिकांची कुचंबणा टाळण्या साठी जागोजाग सुसज्ज असे सार्वजनिक स्वछता गृह बांधणे.

🌀युवकांसाठी ओपन जिम:
 युवकाचे मन-मनगट-मेंदु सुदृढ करण्यासाठी, शरीर सौष्ठव आणि शरीर संवर्धनासाठी प्रत्येक प्रभागात व्यायाम शाळा बांधून अत्याधुनिक मशनरी लाऊन प्रशिक्षक नेमू,

🌀महिलांसाठी महिला सामाजिक केंद्रे:
प्रत्येक प्रभागात महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधून महिलांना सामाजिक प्रवाहात सहभागी होण्याची संधी देण्यासाठी व मुक्त विचार स्वातंत्र्य देण्यासाठी सुरक्षित दालन निर्माण करणे.

🌀प्रत्येक प्रभागात समाज भवन:
 प्रभागातील प्रत्येक समाजाला सार्वजनिक जागेवर स्वतंत्र सभागृहची निर्मिती करून
देण्याचे हमी.

🌀ओपन स्पेस चे सौंदर्याकरण
 प्रभागातील नवीन नगरपालिकेला नियमानुसार हस्तांतरित केलेल्या प्रत्येक लेआऊट मधील ओपन स्पेस चे सौंदर्याकरण करू, वयस्क आणि बालकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करू.

वणीच्या सर्वांगीण सुंदर स्वच्छ विकासासाठी आपली अमूल्य मते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस -महाराष्ट्र नवनिर्माण सेना - संभाजी ब्रिगेड -भीम आर्मी, मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करा...


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();