टॉप बातम्या

वणीकरांच्या साथीनं शहराचा कायापालट घडवण्याचा निर्धार – डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम)

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसे मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीकडून डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. नगराळे (गेडाम) वैद्यकीय सेवेतून महिलांच्या सुख दुःखात सहभागी राहिल्या असून लोकांच्या वेदना समस्या आणि संघर्षाना जवळून पहिल्या आहेत. त्यांच्या सोबत पती विजय नगराळे यांची शहरातील सक्रिय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांगली ओळख आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटीबद्ध असून “विकासकामांच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट करू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर विकास साधता येतो, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. हीच भूमिका पुढे नेत शहराला न्याय देण्याची जबाबदारी आपण पार पाडू, अशी भावना डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांनी व्यक्त केली. प्रभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याची त्यांच्यात क्षमता असून मतदारांनाही त्यांच्यावर विश्वास वाटत असल्याचे दिसून येत आहे.
उबाठा–काँग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असून आमदार संजय देरकर यांच्या आशीर्वादाने विकासकामांना गती मिळेल, यात शंका नसल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();