सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : शिवसेना-युवासेना (शिंदे) पक्षाच्या ध्येय–धोरणांच्या विरोधात कार्य केल्याचा ठपका ठेवत युवासेनेतील मारेगाव शहर संघटक योगेश विठ्ठल नागोसे व सोशल मीडिया शहराध्यक्ष तन्मय गोपाल सरोदे यांना पक्षातील सांभाळत असलेल्या पदावरून कार्य मुक्त करण्यात आले आहे. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकार यांनी कार्यमुक्त केले. तसेच संबंधितांना पक्षाचे नाव व चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, रिक्त झालेल्या पदांचा तात्पुरता प्रभार मारेगाव शहर संघटक म्हणून शुभम ठावरी आणि सोशल मीडिया शहराध्यक्ष म्हणून असीम सलीम शेख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लवकरच वरिष्ठ पातळीवरून अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे सेनेचे तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकार यांनी पत्राद्वारे देण्यात आली आहे.