सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार वेग पकडत असताना प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे राजकीय बळ मिळाले आहे. येथील शेकडो मुस्लिम युवकांनी जल्लोषात भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या शक्तीत लक्षणीय वाढ केली. या मोठ्या पक्षप्रवेशानंतर प्रभागातील भाजप उमेदवारांचा भव्य सत्कारही करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण नव्या चर्चांनी रंगून गेले आहे.
पक्षप्रवेश कार्यक्रमाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार स्वतः उपस्थित होते. युवकांचे स्वागत करताना त्यांनी म्हटले, "हा पक्षप्रवेश ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही संकल्पना आज इथे प्रत्यक्षात उतरली आहे.”
कार्यक्रमात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम, तसेच प्रभाग क्रमांक 10 चे दोन्ही उमेदवार आरती वांढरे व अनिल चिंडालीया यांना संयुक्त पाठींबा जाहीर करण्यात आला. यामुळे भाजपच्या प्रचार मोहीमेला नवचैतन्य लाभल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रसंगी निलेश चौधरी (अध्यक्ष, वणी शहर भाजपा),अंकुश बोठे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप),अरुण कावडकर (ज्येष्ठ नेते, वणी भाजप), फारुक चिनी प्रमुख उपस्थित होते.