सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रभागाप्रभागातून आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ संचिता विजय नगराळे व इतर सर्व नगरसेवक नगरसेविका यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उबाठा, काँग्रेस, मनसे तसेच मित्र पक्षांनी एकत्रितपणे हाती घेतलेली जनजागृती मोहीम नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे चित्र रविवारी दिसून आले.
आज प्रभात 7 आणि 9 प्रभागात आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घरदारापर्यंत संपर्क साधत जनसंवाद साधला.
निवडणूक चुरशीची होणार असल्याचे हे चित्र स्पष्ट झाले असून प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसत आहे. मात्र, सात व नऊ प्रभागात आज झालेल्या संपर्कसभांना मिळालेल्या उत्साहपूर्ण प्रतिसादामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उर्जा संचारल्याचे दिसून आले.

