सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : शहरात निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच एका नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम). सुशिक्षित पार्श्वभूमी, वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव आणि समाजसेवेची जाणीव या तिन्ही गोष्टींनी समृद्ध असलेले हे व्यक्तिमत्त्व शहराच्या राजकारणात नवं पान लिहिण्यास सिद्ध झाले आहे.
वैद्यकीय सेवेत काम करताना थेट माणसांच्या समस्या, गरजा आणि वेदना जवळून जाण्याची संधी डॉ. नगराळेंना मिळाली. रुग्णांची सेवा करताना ज्या संवेदनशीलतेची आवश्यकता असते, त्याच भावनेने व्यापक समाजकार्यात उतरायचा त्यांचा निर्णय शहराने उबदार मनाने स्वीकारला आहे.
वणी शहरातील प्रत्येक प्रभागात त्यांच्या गृहभेटी, संवाद सभा आणि महिला संपर्क अभियानांना अनपेक्षित असा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. घराघरातून मिळणारा विश्वास, रस्त्यावर भेटणारे नागरिक म्हणत आहेत. “आमचं ठरलं…!”
यात केवळ निवडणुकीचा उत्साह नाही, तर एक सुशिक्षित, दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज वणी शहराला आता प्रकर्षाने जाणवते आहे. शहराच्या विकासाची दिशा बदलण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी सक्षम व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांचा उमेदवारीचा निर्णय नागरिकांमध्ये आशेचा किरण बनला आहे.
आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी संधी या सर्व क्षेत्रांबाबत स्पष्ट योजना घेऊन चालणाऱ्या या नेतृत्वाकडे जनतेचा ओढा दिवसेंदिवस वाढताना जाणवतो.
