टॉप बातम्या

वणी–यवतमाळ मार्गावरील भीषण अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी–यवतमाळ रोडवर मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी साधारण 3.15 वाजताच्या सुमारास लालपुलिया परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगात येणाऱ्या ट्रकने मोपेड दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाली. मृत महिलेची ओळख नाजनीन फातिमा शेख मकसूद शेख (वय अंदाजे 40), रा. ख्वाजा नगर, लालपुलिया अशी करण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();