टॉप बातम्या

आघाडीचा झंझावात; वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराचे रणशिंग फुंकले


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने आज एकत्रित शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा जोरदार शुभारंभ केला. जैन ले आउट हनुमान मंदिरात तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आघाडीची एकजूट दाखवली.
या शुभ प्रसंगी शहराच्या विकासाचा रोडमॅप मांडत आघाडीने एकदिलाने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचा प्रचार झंझावात सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळाले.प्रभाग क्रमांक 2 मधून भावी नगराध्यक्षा सह नगरसेवक नगरसेविका यांच्या विजयासाठी मुहूर्तमेढ रोवली.
आगामी दिवसांत घरदारी संपर्क मोहीम आणि सर्व प्रभागांत प्रचाराची गती वाढवण्यात येणार असल्याचे आघाडीने सांगितले. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();