सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : एचपी गॅस कनेक्शन धारकांसाठी ई-KYC प्रक्रिया आता अनिवार्य करण्यात आली असून, ग्राहकांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असे आवाहन मे.चोखाजी एचपी गॅस एजन्सीचे संचालक आणि ग्रामीण वितरक श्री. राजू दारुंडे यांनी केले आहे.
गॅस कनेक्शनची सुरक्षितता, ग्राहकाची सत्यापित माहिती आणि सेवा पुरवठा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने ई-KYC आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया ग्राहक स्वतःच्या मोबाईलवरून HP Pay अॅप च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने करू शकतात. तसेच, ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया करणे शक्य नाही त्यांनी धामणी रोडवरील एचपी गॅस एजन्सी कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊनही ई-KYC पूर्ण करू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

