टॉप बातम्या

वणी नगरपरिषदेच्या रिंगणात ‘महा-अदला बदल’! मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने?

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा चित्र नेहमीपेक्षा वेगळं आणि अधिक रंगतदार दिसत आहे. राज्यात महायुतीची सत्ता असताना वणीमध्ये मात्र राजकीय ‘अदला-बदली’चा अनोखा खेळ पाहायला मिळत आहे. भाजपातील नाराजांचे शिंदे गटात प्रवेश आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांचे भाजपात पुनरागमन. ही दुहेरी ‘राजकीय उलाढाल’ शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे.
दोन्ही पक्षांतून होणाऱ्या या परस्पर प्रवेशामुळे निवडणूक थेट आमने-सामने झाली आहे. मात्र,या राजकीय गोंधळात मतदार शांतपणे निरीक्षण करत असून, ‘अवाजवी गदारोळ नाही. काम करणारा उमेदवार हवा’ हा स्पष्ट संदेश मतदारांच्या मनात ठळकपणे उमटताना दिसतो.

निवडणुकीचे वातावरण तापू लागले असून उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठी वाढवल्या आहेत. घर-दार मोहिमा सुरू असल्या तरीही यंदा सोशल मीडियावरचा प्रचार प्रचंड आक्रमक झाला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवरील पोस्ट, रील्स आणि प्रचार व्हिडिओंमुळे ही निवडणूक खरी अर्थाने ‘हायटेक’ झाली आहे.
वणीसारख्या बहुविध, बहुजन शहरात उमेदवारीच्या चर्चेतही ‘तुझं माझं जमेना’ अशी अवस्था निर्माण झाल्याने मतदार अधिकच संभ्रमात आहेत. कोण कुणाचा गेम करणार, कोण कुणाला मात देणार. यावर राजकीय पंडितांपासून चहाच्या टपरीवरील गटांपर्यंत सर्वत्र चर्चांना ऊत आला आहे.

आता पाहण्यासारखे इतकेच, या हायटेक रणधुमाळीत ‘लाईक्स’ आणि ‘फॉरवर्ड्स’पेक्षा कोणाचा ‘मतांचा बटन’ जास्त जोरात दाबला जाणार? वणीची जनता शांत असली, तरी तिचा कौल मात्र संपूर्ण राजकीय गणितच उलथून टाकणारा ठरणार, यात शंका नाही!
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();