टॉप बातम्या

वणीमध्ये राजीनाम्यांची मालिका; राजकारणाला लागली चुरस, दोन शहराध्यक्षांच्या अचानक राजीनाम्याने शहरात चर्चेची जोरदार धुम


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नगरपरिषद निवडणुकीची तयारी जोमात सुरू असताना वणीच्या राजकारणात अनपेक्षित कलाटणी आली आहे. प्रचाराच्या सभा, बैठका, कॉर्नर सभांचा ताप वाढत असतानाच दोन शहराध्यक्षांनी दिलेल्या अचानक राजीनाम्याने वणी शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामे सत्र सुरू झाल्याने नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. या राजीनाम्यांमागील कारणे नेमकी काय? राजकीय दडपण, पक्षांतर्गत मतभेद की निवडणुकीतील नवी रणनीती? या सर्व प्रश्नांची कुजबुज शहरभर सुरू आहे.

वणी येथील कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा शामाताई तोटावार आणि काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष प्रमोद लोणारे यांनी अचानक राजीनामा दिल्याने, स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकीकडे प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढत असून येत्या काही दिवसांत आणखी काही घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या तरी या राजीनाम्यांमुळे निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. वणीतील जनतेचे लक्ष आता आगामी निर्णयांवर आणि पुढील राजकीय हालचालींकडे लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();