सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिवसेना (शिंदे) सेनेच्या निवडणूक कार्यक्रमाला दिशा देणारे प्रचार कार्यालयाचे भव्य उदघाटन वणीच्या राम मंदिर रोडवर उत्साहात पार पडले. जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
उदघाटन प्रसंगी नेतृत्त्वाकडून पक्षाच्या उमेदवार आणि त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत थेट पोहोचण्याच्या उपक्रमांवर आणि प्रभागातील बूथ केंद्र विस्तारावर चर्चा झाली. प्रभागातील नागरिकांनाही या कार्यालयामुळे आपल्या उमेदवारासाठी एक थेट संपर्क साधता येणार असल्याचे सांगण्यात आले.

