टॉप बातम्या

एंजल एकॅडमी तर्फे स्किन ट्रिटमेंट मोफत कार्यशाळा संपन्न


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : येथील एंजल एकॅडमी वणी द्वारा वसंत जिनींग सभागृहात स्किन ट्रिटमेंटची भव्य मोफत कार्यशाळा संपन्न झाली.यावेळी असंख्य प्रशिक्षणार्थी मुलींनी यात सहभागी झाल्या होत्या.

या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणुन स्किन थेरेपिस्ट दिलीप वोहरा, संगीता वोहरा (पुणे) विशेषत्वाने उपस्थित होते.कार्यशाळेचे उद्घाटन फिटनेस कोच कशीश मॅडम (वणी) यांनी केले तर अध्यक्षस्थानी पत्रकार सागर मुने होते. प्रमुख अतिथी म्हणुन आत्मनिर्भर सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा प्रिती पाटील, समाजसेविका सुचिता पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शकांनी त्वचेच्या जटील समस्येवर उपचारासंबधी माहीती दिली.सोबतच चापली नर्सरी चे संचालक राजुभाऊ तुराणकर यांचे नर्सरी प्लांटच्या वतीने प्रशिक्षणार्थी मुलींना याप्रसंगी विवीध वृक्षांचे रोपवाटीका भेट देण्यात आले.

कार्यशाळेची प्रस्तावना कोमल क्षिरसागर यांनी तर, संचालन नासीन शेख व जया लिकेवार हिने व आभार प्रदर्शन आफरीन शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एंजल एकॅडमीच्या संचालिका नमीता पाटील व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न घेतले.
Previous Post Next Post