सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील गुरुनगर येथील रहिवासी व माजी सैनिक शेख रफिक (वय ५२) यांचा गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. जिलानी बाबा यांच्या दर्शनासाठी गेलेल्या रफिक शेख यांच्या कारला रात्रीच्या अंधारात एका वेगवान ट्रकने जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. ही दुर्घटना मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास ११ वाजता घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रफिक शेख दर महिन्याला एकदा जिलानी बाबा यांच्या दर्शनासाठी गडचिरोली येथे जात असत. याच पार्श्वभूमीवर ते मंगळवारी त्यांच्या गाडी (क्र. MH29 AR 5853) ने चालकासह गडचिरोलीला गेले होते. दर्शन करून परतताना रात्रीच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या अपघातात रफिक शेख यांचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माजी सैनिक रफिक शेख यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेची प्राथमिक माहिती समोर आली असून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर सविस्तर अपडेट्स बातमी येईलच...