••अ|भि|ष्ट|चिं|त|न|वा|ढ|दि|व|स••
सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश करून लोकसेवेची वाट निवडणारे आणि गेली तीन दशकं जनतेशी आपुलकीची नाळ जोडून ठेवणारे सन्माननीय मारोती माधव गौरकार यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिवरी गावचे सुपुत्र असलेले गौरकार यांनी आपले शिक्षण दहावी 1986, बारावी 1988 आणि बी.ए. 1992 साली पूर्ण केले. शिक्षणासोबतच समाजकार्याची आवड जोपासत त्यांनी 1993 साली पहिल्यांदाच आदिवासी सहकारी संस्था, सगणापूर येथून निवडणूक लढवली. त्या वेळी सहकार क्षेत्रातील दिग्गज डाखरे पाटील यांच्या विरोधात लढताना थोडक्यात पराभव पत्करावा लागला, परंतु हाच पराभव त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया ठरला.
या निवडणुकीतून प्रेरणा घेत त्यांनी 1996 साली आपल्या मूळगावी हिवरी ग्रामपंचायतीत पॅनल उभे करून दणदणीत विजय मिळवला. विरोधी गटातील प्रबळ नेत्यांना पराभूत करत ग्रामविकासाचा नवा अध्याय त्यांनी सुरू केला. यानंतर 2003 साली पिसगाव येथे स्थलांतरित होऊन तेथील ग्रामपंचायत निवडणुकीतही स्वतःच्या पॅनलसह विजयी झाले. 2008 मध्ये पॅनलचे नेतृत्व करताना त्यांनी 2015 साली उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आणि 2003 पासून आजपर्यंत स्थानिक राजकारणात सातत्याने सक्रिय राहिले आहेत.
💥सहकार क्षेत्रातही ठसा उमटवला —
पिसगाव आदिवासी सहकारी संस्थेत गणू पाटील थेरे यांच्यासोबत त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. त्यानंतर 2008 ते 2018 या कालावधीत ते कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावचे संचालक राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सलग 10 वर्षे कार्यरत राहून शेतकरी आणि व्यापारवर्गासाठी अनेक उपक्रम राबवले.
💥राजकीय नेतृत्वातही भक्कम पाऊल —
2017 ते 2018 या कालावधीत तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष, तर 2018 ते 2020 या काळात महासचिव पद भूषविले. कोरोनाकाळात 2020 पासून सलग दोन टर्म त्यांनी तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि कामगार यांच्या प्रश्नांसाठी विविध आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे घेण्यात आली.
या दीर्घ आणि उल्लेखनीय कार्यप्रवासाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना यवतमाळ जिल्हा काँग्रेस महासचिवपदाची जबाबदारी सोपवून त्यांचा "वाढदिवस" सन्मानाचा क्षण बनवला आहे.
जनतेशी जवळीक, कार्यकर्त्यांशी आत्मीय नाते आणि विकासदृष्टी अशी ओळख असलेल्या मारोती माधव गौरकार यांच्याकडून आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🎉
“समाजासाठी दिलेले आयुष्य हेच माझे खरे बळ आहे,”असे सांगणारे गौरकार आजही आपल्या तळागाळातील जनतेशी नाळ जपून लोकसेवेसाठी तत्पर आहेत.
✍️ संपादकीय