सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : लालगुडा परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मधील रस्ता अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रहिवासी प्रतीक प्र. गौरकार यांनी ग्रामपंचायत लालगुडा (वणी) येथे रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी करणारा लेखी अर्ज सादर केला आहे.
सदर रस्ता खराब झाल्यामुळे वृद्ध नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनधारक यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, पाणी साचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
गौरकार यांनी ग्रामसेवकांना विनंती केली आहे की, नागरिकांच्या दैनंदिन हालचालीत अडथळा निर्माण करणाऱ्या या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून दिलासा द्यावा.