वणी : आज 6 नोव्हेंबर 2025 रोजी वणी शहरात होणारे दोन महत्त्वाचे कार्यक्रम शिवसेनेचा “जनता दरबार” आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा प्रशासनिक कारणास्तव स्थगित करण्यात आले आहेत. आयोजकांकडून या कार्यक्रमांच्या पुढील तारखेबाबत लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत महसूल भवन, वणी येथे “जनता दरबार” आयोजित करण्यात आला होता, तर दुपारी 3 ते सायं. 6 या वेळेत श्री. विनायक मंगल कार्यालय, वणी येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता. या सोहळ्यात मा. संजय राठोड (पालकमंत्री) आणि विश्वासभाऊ नांदेकर (माजी आमदार, वणी विधानसभा) यांची प्रमुख उपस्थिती अपेक्षित होती.
मात्र अनपेक्षित कारणास्तव हे दोन्ही कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजयकुमार चोरडिया (शिवसेना पक्षनेते) यांनी जनतेला व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, नवीन तारखेची अधिकृत घोषणा होताच त्याची माहिती माध्यमांद्वारे दिली जाईल.
वणीतील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे थोडी निराशा असली तरी, पुढील काळात हे कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडतील, असा विश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
