टॉप बातम्या

वणीत राजकीय वारे जोरात — डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांचा शिवसेना (उबाठा गट) मध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रसिद्ध समाजसेविका आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांनी शिवसेना (उबाठा गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

हा प्रवेश सोहळा आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या नेत्या आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. नगराळे यांच्या प्रवेशामुळे वणीतील शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले आहे.

नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्याने सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून, नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यासाठी पक्षात दरवाजे खुले केले जात आहेत. डॉ. नगराळे यांचा पक्ष प्रवेश ही वणीतील राजकीय समीकरणे बदलणारी घडामोड ठरू शकते, असे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.

महिला नेतृत्वाच्या बळकटीसह सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या डॉ. नगराळे यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (उबाठा गट) वणीमध्ये आपला प्रभाव वाढवेल, असा पक्षातील विश्वास आहे. यामुळे येणाऱ्या नगरपरिषदेच्या रणधुमाळीत वणीतील राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();