सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जडवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. डोलोमाईट, कोळसा वाहतूक, गिट्टी क्रेशर वाहतूक इत्यादी सर्व प्रकारची जडवाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.
या आंदोलनास स्वतः आमदार संजय देरकर या ठिकाणी उपस्थित होते. शिवसैनिक व नागरिक रस्त्यावर उतरून हे आंदोलन छेडले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने जर कामात ढिलाई केली, तर अशा अधिकाऱ्यांना अद्दल घडवण्याची तयारीही शिवसेनेकडून असल्याची गर्भीत ईशाराही दिला.
कामात कुठल्याही प्रकारची त्रुटी चालणार नाही, अन्यथा शिवसेनेचा रुद्र अवतार रस्त्यावर दिसेल, असा स्पष्ट आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यातून दिसून आले.
या आंदोलनात संजय निखाडे (जिल्हाप्रमुख), संतोष कुचनकर (तालुकाप्रमुख), लूकेश्वर बोबडे (उपतालुका प्रमुख), तुळशीराम बोबडे (सर्कल प्रमुख), भारत डंभारे, राजेंद्र ईद्दे (तालुका सचिव), दिवाकर कवरासे (विभाग प्रमुख), जीवन डवरे, अंकुश ठावरी (उपसरपंच), गौतम सुराणा (माजी सरपंच), विजय ठाकरे (उपतालुका प्रमुख), अजय कवरासे (सरपंच), कुंदन टोंगे, विठ्ठल बोंडे, संजय खामनकर, गजानन टोंगे, संदिप थेरे, प्रितम बोबडे, योगराज आत्राम (सरपंच), पद्माकर देरकर आणि मोरेश्वर पोतराजे यांच्यासह असंख्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही जाहिरात तुमच्या फायद्याची असू शकते...