टॉप बातम्या

पावसाचा कहर: शेतीचे मोठे नुकसान,घरातही शिरले पाणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने कहर केला असून, आलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह घरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे, आणि पिके वाया जात आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मारेगाव तालुक्यातील शिवणी येथील शेतातील पिके खरवडून गेली आहे. कापूस, सोयाबीन यांसारख्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे वाया गेली आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तसेच बेंबळा ओव्हरफ्लो होऊन फुटला यामुळे गावात घरातही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालेत.येथील नागरिकांनी कशी बशी रात्र काढली.
सततचा पाऊस, बेंबळा वारंवार ओव्हरफ्लो आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान पाहता, सरकारने या परिस्थितीला 'नैसर्गिक आपत्ती' म्हणून घोषित करावे, अशी मागणी जोर धरत आहे, 
Previous Post Next Post