सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील बोटोणी जवळ द बर्निंग ट्रेन नसून द बर्निंग ट्रक हा धावता ट्रक ये-जा करणाऱ्याच्या समोर जाग्यावर जळून खाक झाल्याची वृत्त समोर आले आहे.
आज दि. 16 ऑगस्ट शनिवारला सकाळी 5 वाजता राज्य महामार्गांवर बोटोणी च्या जवळपास करंजी कडून सोयाबीन घेवून जाणाऱ्या धावत्या ट्रक क्रं. (MH 26 AB 0954) ला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. चालक व वाहकाने सतर्कता बाळगत ट्रक थांबवित खाली उतरले. यावेळी दुतर्फा वाहतूक बराच वेळ खोळबंली होती. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही.
चक्क! सोयाबीनच्या पोत्याने भरलेला ट्रक काही वेळातच आगीत पूर्णपणे जळून खाक झाला. पांढरकवडा अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, दरम्यान आग नियंत्रणात आणली. मात्र, सदर घटनेत मोठे नुकसान झाले. अपघाग्रस्त ट्रक हा ढाणकी बिटरगाव वरून येत चंद्रपूर कडे जात होता.
अपघात होताच पांढरकवडा व मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. ठप्प पडलेली वाहतूक सुरळीत केली. परंतु या घटनेने बघ्यांना ऐंशी च्या दशकातील "द बर्निंग ट्रेन" या हिंदी चित्रपटातील त्या जळत्या ट्रेन चा प्रत्यक्ष थरार करंजी मारेगाव महामार्गांवर ट्रक जळताना पहायला मिळाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीकडून चर्चील्या जात होते.