सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या तोंडावर महाविकास आघाडीचा (उबाठा-काँग्रेस व मनसे, मित्रपक्ष) प्रचार मोहीमेला वेग घेत आहे. नागरिकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद, मजबूत संकल्पनामा आणि मतदारांचा वाढता कौल यामुळे आघाडीचे बळ अधिक दृढ होताना दिसत आहे.
उद्या प्रचाराचा अंतिम दिवस असून सर्वच पक्षांनी मैदानात जोमाने कंबर कसली आहे. मात्र, उबाठा, काँग्रेस आणि मनसे, मित्रपक्ष एकत्र येत लढत असल्याने आघाडीच्या नगराध्यक्ष व प्रभागातील उमेदवारांना मतदारांकडून चांगली हवा मिळत असून शहरातील विविध प्रभागात गाठीभेटी, सभांमध्ये आणि दैनंदिन संवादांत आघाडीला ऊर्जित प्रतिसाद मिळतो आहे.
महाविकास आघाडीच्या संयुक्त घोषणापत्रातील मूलभूत सुविधा, विकासाभिमुख योजना, पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या अपेक्षांना प्राधान्य देणारा संकल्पनामा मतदारांना आकर्षित करत आहे. स्थानिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि नागरिकांचा वाढता सहभाग आघाडीचे वातावरण अधिक मजबूत करणारा ठरत आहे.



