टॉप बातम्या

"न भूतो न भविष्यती": शिंदे सेनेचे आज अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नगर परिषद निवडणुकीचा अंतिम टप्पा समीप असताना शिंदे सेनेने आज न भूतो न भविष्यती असे वर्णन करता येईल असे अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे या शक्ती प्रदर्शनात लाडक्या बहिणींचा हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

सकाळपासूनच शासकीय मैदान (पाण्याची टाकी परिसरात) नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमू लागली होती. मैदान भगवे झेंडे, महिलांचा उत्साह, युवकांची ऊर्जा आणि घोषणांनी दणाणून गेले.

रॅलीला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिंदे सेनेला मोठी चालना मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शहरातील विविध प्रभागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उमेदवारांना जोरदार पाठिंबा देत प्रचार अधिक जोमात नेला.

या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शेवटच्या टप्प्यातील निवडणूक लढत अधिक रंगतदार झाली असून शिंदे सेना दमदार संघर्षासाठी सज्ज झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();