टॉप बातम्या

वणीत भाजपची भव्य शक्ती प्रदर्शन रॅली; मंत्र्यांच्या घोषणांनी सभेला उत्साह

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे 29 नोव्हेंबर रोजी भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले. शासकीय मैदानावरून दुपारी 1 वाजता निघालेल्या या रॅलीला मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील मुख्य मार्ग ओलांडत ही रॅली पुन्हा मैदानावर दाखल झाली आणि त्यानंतर जाहीर सभेने कार्यक्रमाची सांगता झाली.

या सभेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदुरकर, माजी जिल्हा प्रमुख तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.

यावेळी मंत्री बावनकुळे यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. शासकीय जागांवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप, वणीतील १०० महिला बचत गटांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अनुदान, गरजू शेतकऱ्यांचे कर्जमाफी, ४० वर्षांपासून जंगलजमिनीवर राहणाऱ्यांना हक्काचे पट्टे, पांदण रस्त्यांची तत्काळ बांधणी आणि वणी शहरात व्यापक सीसीटीव्ही जाळे उभारून सुरक्षा बळकट करण्याची हमी त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले.

या प्रसंगी मंत्री बावनकुळे, मंत्री उईके, जिल्हा अध्यक्ष अॅड. प्रफुल चैव्हान, दिनकर पावडे, संजय पिंपळसेंडे, शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम यांच्यासह भाजपचे २९ नगरसेवक पदाचे उमेदवार, अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();