सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार
केळापूर, (०१ संप्टें.) : श्री. अशोक नारायण भांडेकर यांची पांढरकवडा शहर उपअध्यक्ष म्हणून नियुक्ती जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांनी केली आहे.
श्री. अशोक भांडेकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक व शिवसेना शहर अध्यक्ष म्हणून या आधी सुद्धा शिवसेनेचे काम केले आहे. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिहर लिंगणवार युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. जयवंत बंडेवार व सर्व शिवसैनिक यांना दिले.
शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून अशोक नारायण भांडेकर यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
