सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (०१ ऑगस्ट) : तालुक्यातील पाटणबोरी येथे कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर जगन राठोड, उपविभागीय कृषि अधिकारी, पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषि अधिकारी कार्यालय पांढरकवडा मार्फत सुरक्षित रासायनिक कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आले.सदर शिबिरात डॉ.बिराजदार व डॉ.निखिल चव्हाण प्रा.आ.के. पाटणबोरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराकरिता पाटणबोरी, पिंपरी बोरी, वाऱ्हा, कवठा, सून्ना, घुबडी, वडवाट येथील फवारणी करणारे शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना रासायनिक कीटक नाशकांची सुरक्षित हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच कापूस व सोयाबीन पिकावरील कीड व रोगाबद्दल माहिती राकेश दासरवार तालुका कृषि अधिकारी पांढरकवडा यांनी केले. सिंजेटा इंडिया लि. मार्फत उपस्थितांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
पाटणबोरी येथे कीटकनाशक फवारणी किट चे वाटप व आरोग्य तपासणी शिबिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
