सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
यवतमाळ, (०१ संप्टें.) : यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अमोल भाऊ येडगे साहेबांनी स्वतःचा पिक पेरा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी स्वतः अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने भरण्याचा कार्यक्रम हाती घेऊन पुढाकार घेतलेला यासाठी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान सुद्धा केले आहे सद्या कृषी व महसूल खात्याकडून चालू आहे राज्य शासनाच्या माध्यमातून लवकर तंत्रज्ञानाचे हे कार्यक्रम घोषित करण्यात आले आहे शेतकऱ्यांचा पिक पेरा , हा तलाठी कडून भरल्या जात होता यंत्रणेच्या माध्यमातून हा पिक पेरा स्वतः शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामातील भरून अचूक माहिती शासनाला व प्रशासनाला प्राप्त व्हावी यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतल्या बोलल्या जात आहे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कोणती पिके पेरली आहेत ही माहिती शेतकर्यांकडून घेऊन आजपर्यंत तलाठी कार्यालयात भरत आलेली आहे मागील दोन वर्षापासून पिक विमा काढताना पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र शासनाने अंमलबजावणी केली आहे असे असताना तलाठी व महसूल यंत्रणेवर ताण कमी करून हा नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे याबाबत ग्रामीण विभागामध्ये शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून सोशल मिडिया , तलाठी असेल त्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम चालू आहे. याचाच भाग म्हणून महागाव तहसील अंतर्गत काल कासोळा महसूल मंडळांत बोरी ईजारा या गावचे तलाठी डी व्ही मिठे यांनी मनीष भाऊ जाधव शेतकरी नेते यांच्या फार्महाऊसवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या अनुषंगाने त्यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावरून, ई-पिक पाहणी ची माहिती सदर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा भूमापन क्रमांक तसेच सर्वे नंबर गट क्रमांक हंगाम निवडा संपूर्ण वर्ष पेरणीसाठी लावगड उपलब्ध क्षेत्र व उपलब्ध सिंचनाच साधन शेतकरी खातेदार यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई- पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड कशा पद्धतीने करावा लागतो व यामध्ये ई पीक पाहणी नोंदणी कशी करायची यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करून या नवीन ई-पिक पाहणी माहिती दिली. यावेळी अकबर पठाण अजय भाऊ चव्हाण प्रदीप जाधव सुखदेव डवरे शेतकरी उपस्थित होते.
काय म्हणाले? शेतकरी नेते
मनीष भाऊ जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ
वर्गवारी होऊन निश्चित आकडेवारी प्राप्त होईल शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये लाभ घेताना याचा फायदा होईल. अनेक वेळा घोषणापत्रामध्ये वेगळ्या पिकांची नोंद असायची व क्षेत्रावर वेगळी अशा एक नव्हे तर अनेक अडचणी यामध्ये येत होत्या, आता त्या अडचणी निश्चित दूर होतील पण त्यासोबत डोंगराच्या कुशीमध्ये या आदिवासी बहुल यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल असतोच असे नाही. हे जीपीएस सिस्टिम असून याला नेट असणे अत्यंत गरजेचे त्याशिवाय, ई-पीक पाहणी नोंद नेटचा च्या अभावी ग्रामीण विभागात अनेक वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊ शकते, आर्थिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच असे नाही. माहिती भरताना शासनाचे सर्व्हर वारंवार डाऊन होते,सर्व्हरची स्पीड टिकत नसल्याचे शेतकऱ्यांना शेतामध्ये इंटरनेट ची स्पीड कमी जास्त ही येताना दिसत आहे असे अनेक अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे शासनाने उपलब्ध संसाधनाचा ही विचार होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची हेळसांड होऊ नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने दक्षता घ्यावी.
बोरी इजारा शेत शिवारात शेतकऱ्यांच्या बांधावर ई- पीक पाहणी,
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
