सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त ॲड.कुणाल विजय चोरडिया यांच्या अध्यक्षते खाली शहरात सुप्रसिद्ध हेमंत बृजवासी यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी शासकीय मैदान येथे करण्यात आले होते. इंडियन आयडॉल विनर बृजवासी यांनी वक्रतुंड महाकाय.. हे गणेश वंदना सादर करून बाप्पाची वंदना केली. त्यानंतर राधे राधे भजन सादर करण्यात आले. हेमंत बृजवासी प्रसिद्ध असलेलं किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाये हे भजन सादर करून कृष्ण भक्तीची चाहूल करून दिली.
त्यानंतर विठ्ठल विठ्ठल सबसे प्यारा विठ्ठल है, हे सादर करून रसिक मंत्रमुग्ध झाले अन् प्रेक्षक भजन कडे वळली. काली कमली मेरा यार है गाणे सादर करण्यात आले. शिवाचे तांडव गीत अकड बंबबम..अकड बंबबम भोले या गीताने रसिक देहभान हरपून गेले होते. श्री राम जानकी बैठे है मेरे सिनेमे सादर करून रसिक तल्लीन होऊन गेले होते. खाटू वाले ओ खाटू वाले हे भजन सादर करून रसिकांची मने जिंकून घेतली. लगन लागी तुमसे मन की लगन, छोटे छोटे गैया छोटे छोटे बाल अशी एका पेक्षा एक सुरेख गीत सादर करण्यात आली.