टॉप बातम्या

प्रभाग 5 मधून शिंदे सेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद: नगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका प्रचारात आघाडीवर..


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 5 मध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार जोरदार गतीने सुरू असून, मतदारांकडून मिळणारा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिंदे सेना या प्रभागात आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

नगराध्यक्ष पदापासून नगरसेवक-नगरसेविका पदांपर्यंतच्या सर्व उमेदवारांना नागरिकांची ठोस पसंती मिळत असल्याचे वातावरण असून, प्रत्येक सभेत वाढणारी गर्दी याची साक्ष देत आहे. शिंदे सेनेच्या प्रचार सभांना, कॉर्नर सभांना, रॅलींना आणि घरदार जनसंवादाला मिळणारा ओसंडून वाहणारा प्रतिसाद पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करीत आहे.

प्रत्येक गल्लीतून उमटणाऱ्या घोषणांनी संपूर्ण प्रभागाचा माहोल रंगलेला असून, स्थानिक विकास, शहराच्या गरजा, सुविधा आणि बदलाच्या आशेवर आधारित शिंदे सेनेचा प्रचार मतदारांच्या मनात भक्कम ठसा उमटवत आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्वच घटकांकडून मिळत असलेले समर्थन पाहता या प्रभागात शिंदे सेना मजबूत स्थितीत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

निवडणुकीला अवघे काही दिवस असताना प्रभाग 5 मध्ये शिंदे सेनेचा प्रचार ‘टॉप गिअर’ मध्ये असून अंतिम टप्प्यात या लाटेचा फायदा उमेदवारांना मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();