सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : संविधान दिन आणि शामदादा कोलाम जयंतीनिमित्त मारेगाव शहरात श्रद्धा व आदराचे वातावरण पाहायला मिळाले. आंबेडकर चौक येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मार्डी चौकात क्रांतीवीर शामदादा कोलाम यांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा महासचिव मारोती गौरकार, शा. को. सं स. गंगाधर लोनसावळे महाराज, दिवाकर येरमे, बळीराम आत्राम, गणेश लोनसावळे, पूनम कोरझरे, रामकृष्ण खडी आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधान निर्माते डॉ. आंबेडकर व समाजातील अत्याचारांविरुद्ध लढा देणारे क्रांतीवीर शामदादा कोलाम यांच्या कार्याचा उपस्थितांनी यावेळी स्मरण करून आदरांजली अर्पण केली.