टॉप बातम्या

वणी नगरपरिषद निवडणूक : “माझं उद्दिष्ट राजकारण नव्हे, जनसेवा” — डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम)

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीगेल्या १८ वर्षांपासून वणी शहरात वैद्यकीय सेवेत कार्यरत राहून शेकडो कुटुंबांच्या सुख-दुःखात सहभागी झालेल्या डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) यांनी आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा निर्णय जाहीर केला आहे. लोकांच्या वेदना, समस्या आणि संघर्षांना जवळून पाहताना “इतरांच्या आयुष्यात आनंद आणणे हीच खरी पूजा” असल्याची जाणीव मनात घट्ट रुजली, असे त्या सांगतात.

महिला राखीव झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निर्णयानंतर लोकांचा प्रचंड पाठिंबा, विश्वास आणि स्नेह हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “दररोज असंख्य फोन येतात, लोक घरी भेटायला येतात आणि एकच गोष्ट सांगतात ‘मॅडम, वणीला तुमच्या सारख्या उच्च शिक्षित, संवेदनशील नेत्याची गरज आहे.’ ही जनतेची मनापासूनची अपेक्षा माझ्या मनाला खोलवर स्पर्शून गेली,” असे त्या म्हणाल्या.

डॉ. नगराळे पुढे म्हणाल्या, “वणीच्या प्रत्येक कुटुंबाचा अभिमान वाढवणारे स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि प्रगतीशील शहर घडवण्याचे माझ्या मनात अनेक वर्षांपासून स्वप्न आहे. जर जनतेचे आशीर्वाद लाभले, तर ही जबाबदारी मी सेवाधर्म म्हणून स्वीकारेन. पारदर्शक प्रशासन, प्रामाणिक कामकाज आणि शहराच्या विकासाची पराकाष्ठा हेच माझे वचन आहे.”

“ही उमेदवारी केवळ माझी नाही; ही वणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी सुरुवात आहे,” असे सांगत त्यांनी वणीकर जनतेला नम्र आवाहन केले की यावेळेस नगराळे (गेडाम) परिवारावर आपला विश्वास टाकावा.

वणीच्या जनतेतून मिळणारे सकारात्मक प्रतिसाद आणि त्यांच्याबद्दलचा वाढता विश्वास पाहता, या निवडणुकीत डॉ. संचिता नगराळे (गेडाम) यांची उमेदवारी एक उत्तम आणि आश्वासक पर्याय ठरत आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();