सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कृष्ण जन्मोत्सवच्या तिसऱ्या दिवशी आज सायंकाळी भजन संध्याचे आयोजन केले. सुप्रसिद्ध भजन गायक आणि इंडियन आयडोल विनर हेमंत बृजवाशी यांचा भक्तिमय सुमधुर भजन संध्या येथील शासकीय मैदान वर होणार आहे.
जय श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.कुणाल चोरडिया यांच्या सुबक संकल्पनेतून हा भक्तिमय कार्यक्रम आयोजित केला असून वणी येथील शासकीय मैदान (पाण्याची टाकी) येथे भव्यदिव्य मंडपात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला वणी रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
दिनांक. 13, 14, 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट असा चार दिवसांचा विविध कार्यक्रमांनी कृष्ण जन्मोत्सव वणी शहरात पार पडणार आहे. आज या महोत्सवाचा तिसरा दिवस असून भक्तिमय भजन संध्याचे आज आयोजन केले आहे. उद्या शनिवारला गोपाळ काला नंतर कार्यक्रमाची सांगता होईल.

