शामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्त बिगर सातबारा शेतकरी संघटनेची बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : अनुसूचित जमाती पैकी कोलाम समाजाचे दैवत क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून बिगर सातबारा शेतकरी संघटनेची महत्वपूर्ण बैठक संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या आदेशाने विदर्भ अध्यक्ष अजय मंडपे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रीय कार्य अध्यक्ष डॉ सुखदेव कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली बैठकीला मार्गदर्शन करतांना सांगीतले की राज्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक विधान सभेच्या निवडणुकीत महविकास युतीला मिळालेलं स्पष्ट बहुमत ऐतिहासिक असल्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधींचे त्यांच्या निवासस्थानी जावून अभिनंदन करुन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्याबाबतच्या सूचना संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी दिल्या असल्याची महिती अमरावती येथे पार पडलेल्या बैठकीत डॉ सुखदेव कांबळे यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सांगितली पुढें बैठकीत मार्गदर्शन करतांनाडॉ सुखदेव कांबळे म्हणाले की यापूर्वी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या नेतृत्त्वात दादर चैत्यभूमी ते मुंबई मंत्रालय पायदळ मोर्चा काढून भूमिहीनांना जमिनी तर बेघर कुटुंबांना घरे देण्याबाबत मागणी केली असता देवेंद्र फडणविस यांच्या मंत्रिमंडळाने सर्वांसाठी घरे या धोरणाची अंमलबजावणी करणे करिता ग्रामीण भागातील निवासी अतिक्रमणे नियमनुकुल करण्याचा निर्णय घेतला होता त्यांची अंमलबजावणी राज्यात सुरु असुन त्याचा बऱ्यासच्या बेघर कुटुंबांना लाभ मिळत आहे त्याच धर्तीवर पुन्हा देवेंद्र फडणविस यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या नवीन सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात निर्गमित करावा या करिता प्रत्येक आमदाराच्या निवासस्थानी जावून अभिनंदन करुन निवेदन सादर करुन त्यांच्या पोहच पावत्या संघटनेकडे उपलब्ध करुन द्या जेणेकरून हिवाळी अधिवेशनाची तारीख घोषित होण्यापूर्वी भाई जगदीश कुमार इंगळे यांना राज्य विधिमंडळ सचिवालयाकडे पाठपुरावा करणे सोईचे होईल त्याकरिता सर्व कार्यकर्त्याने एकाजुटिने कामाले लागा अश्या सूचना डॉ. कांबळे यांनी बैठकीतून दिल्या.
शामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्त बिगर सातबारा शेतकरी संघटनेची बैठक संपन्न शामादादा कोलाम यांच्या जयंती निमित्त बिगर सातबारा शेतकरी संघटनेची बैठक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on November 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.