सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : नुकतेच अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी संतोष रोंगे यांचे अर्जावरुन मारेगाव तालुक्यातील घोडदरा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ. सुनंदा अशोक आत्राम यांना सरपंच पदावरून अपात्र करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या आदेशाला सौ. सुनंदा अशोक आत्राम, सरपंच, घोडदरा यांनी अपर विभागीय आयुक्तांचे न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले असता, अपर जिल्हाधिकारी यांच्या 'त्या' आदेशाला अपर विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगनादेश मंजूर केला आहे.
संतोष रोंगे यांनी सरपंच सौ. सुनंदा अशोक आत्राम यांचे राहते घर सरकारी जागेवर असून त्यावर पक्के बांधकाम करण्यात आले आहे, असा आरोप करीत सरपंचाचे पद अपात्र घोषित करणेकरीता अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जावर अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी सौ. सुनंदा आत्राम, सरपंच यांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी यांनी सचिवांच्या अहवालातील खाडाखोड व त्रुटीकडे दुर्लक्ष तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मारेगाव कडील अभिलेख्याची पडताळणी न करता आदेश पारीत केल्याने या आदेशाला सौ. सुनंदा अशोक आत्राम, सरपंच, घोडदरा यांनी अपर विभागीय आयुक्तांचे न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले असता, अपर जिल्हाधिकारी यांच्या 'त्या' आदेशाला अपर विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगनादेश मंजूर केला आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी दिनांक ११/१२/२०२४ रोजी होणार आहे. या प्रकरणी सौ सुनंदा आत्राम यांच्या वतीने ॲड. निखिल लोंदे, ॲड. निखिल सायरे, ॲड. रंजित अगमे, ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे व भुषण ब्राह्मणे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
घोडदरांच्या सरपंचा आत्राम यांना कोर्टाचा दिलासा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 22, 2024
Rating: