अपघात....अज्ञात वाहनाच्या धडकेत आय टी आय विद्यार्थी ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील आय टी आय करून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारास उमरी मार्गांवर घडली.

उमरघाट येथील विद्यार्थी राजकुमार दडांजे (वय 20) उमरी (ता. झरी जामणी) हा वणी येथे आय टी आय आला होता, आज सुद्धा आय टी आय करून नेहमीप्रमाणे दुचाकीने उमरीघाट गावाकडे निघाला. अशातच कायर मार्गे भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने उमरी गावानजीक दुचाकी क्र. (एम एच 29-एपी,7741) ला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार राजकुमार हा जागीच ठार झाला. वृत्त लिहेपर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल व्हायची होती. 
अपघात....अज्ञात वाहनाच्या धडकेत आय टी आय विद्यार्थी ठार अपघात....अज्ञात वाहनाच्या धडकेत आय टी आय विद्यार्थी ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on November 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.