दिवसाढवळ्या वाघाच्या दर्शनाने मनगाव-भुरकी परिसरात खळबळ; वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मनगाव परिसरात ग्रामस्थांना दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाले आहे. त्यामुळे मनगाव-भुरकी या गावात घबराट पसरली आहे.

आज सकाळी 10.30 च्या दरम्यान मनगाव परिसरात शेतात काम करत असताना शिवारातील लोकांना वाघाचे दर्शन झाले.त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात वनविभागाला माहिती देण्यात आली असून वृत्तलिहेपर्यन्त संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर आली नसल्याचं सांगण्यात येत होतं. निदर्शनास आलेल्या परिसरात काही नागरिक सुद्धा पोहचले असे सांगण्यात आले.

मागील दोन वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. नदी ओलांडून सदर वाघ भुरकी शिवारात शिरला व भुरकी येथील अभय देऊळकर या तरुणास वाघाने ठार मारले होते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय करण्यात यावा अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.
दिवसाढवळ्या वाघाच्या दर्शनाने मनगाव-भुरकी परिसरात खळबळ; वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी दिवसाढवळ्या वाघाच्या दर्शनाने मनगाव-भुरकी परिसरात खळबळ; वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on November 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.