प्रचारतोफा झाल्या शांत, विधानसभेत होणार चौरंगी लढत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विधानसभेत पक्ष, अपक्षासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाचा दिवस जवळ येत आहे. तस-तशी निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत होती. दरम्यान, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद करण्याचे निवडणूक विभागाचे निर्देश आचारसंहितेत असल्याने सोमवार १८ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या आहेत.

विधानसभा मतदार संघात स्टार प्रचारक राज ठाकरे, उद्धव ठाकरे, माधवी लता, आ. अडबाले यांची सभा पार पडली. रात्रीपासुन गुप्त बैठकांवर भर देण्यात येत होता. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी आपला मतदारसंघ पिंजून काढला. घरोघरी भेट देऊन आम्हालाच मत देण्याची विनंती केली. सकाळ होताच गावखेड्यात प्रचाराच्या गाड्या धडकत होत्या. रात्री कार्यकर्ते बॅण्डबाजासह शहरातील वार्डासह गावखेड्यात रॅली काढून उमेदवारांनी केलेल्या कामाचे, निवडून आल्यानंतर काय काम करणार याचे पत्रक वितरण करून आमच्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करीत होते. प्रचाराची रणधुमाळी संपली असून बुधवार २० रोजी मतदान होणार आहे. शनिवार २३ रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

वणीत भाजपा महायुतीचे आ. संजीवरेड्डी बोदकूरवार, उबाठा महाविकास आघाडीकडून संजय देरकर, अपक्ष संजय खाडे, मनसेचे राजू उंबरकर अशी चौरंगी लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे. तर भाकपाकडून कॉ अनिल हेपट, बसपाकडून अरुणकुमार खैरे, वंचितकडून राजेंद्र निमसटकर, हरीश पाते अपक्ष, राहुल आत्राम अपक्ष, नारायण गोडे अपक्ष, केतन पारखी अपक्ष, निखिल ढुरके अपक्ष उमेदवार आहेत.
प्रचारतोफा झाल्या शांत, विधानसभेत होणार चौरंगी लढत प्रचारतोफा झाल्या शांत, विधानसभेत होणार चौरंगी लढत Reviewed by सह्याद्री चौफेर on November 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.