संजय खाडे यांच्या प्रचारार्थ रोड'शोत उसळला हजारोंचा जनसागर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या प्रचारार्थ वणी शहरात हजारों खाडे समर्थकांनी भव्य रॅली काढली. या रॅलीने शहरात शिट्टीचा एकच आवाज निनादला असुन या निवडणुकीत संजय खाडे बाजीगर ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया मतदारातून भूमिका व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार प्रचाराचा शेवटचा दिवस संजय खाडे यांचे प्रचार रॅली जत्रा मैदान ते टिळक चौक पर्यंत वाज्या गाज्यात व जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. माजी आ. विश्वास नांदेकर, नरेंद्र पाटील ठाकरे, गौरीशंकर खुराणा व अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या नेतृत्वात रॅली पार पडली. दरम्यान अपक्षाने पक्षाच्या बरोबरीची चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत होती. शहरातील जत्रा मैदानातून हजारोच्या संख्येने संजय खाडे समर्थकांनी दीपक चौपाटी सह प्रमुख मार्गातून भव्य रॅली काढून वणी मतदार संघात अपक्षाची वाढलेली ताकद, विरोधकांचे गणित बिघडवले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्याची आतिषबाजीसह रॅलीचे समापन कार्यक्रमात अपक्ष उमेदवार संजय खाडे यांनी सभेत खाडे यांनी आमदार व देरकर यांच्यावर तोफ डागली. 

मतदारसंघात विकास नाही तर भकास - संजय खाडे 
मतदारसंघात 2 हजार कोटींचा विकास झाल्याचा दावा केला जातो. मात्र, हा दावा सपशेल फोल आहे. विकास असेल, तर दिसत का नाही? ज्या ठिकाणी थोडाबहुत विकास दिसतो. ते काम ही निकृष्ट दर्जाचे आहे. मर्जीतील लोकांना कंत्राट देऊन विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला गेला. हा विकास नाही तर भकास आहे. शेतक-यांच्या आत्महत्या होत असताना गेल्या10 वर्षात एकदाही शेतक-यांचा आवाज विधानसभेत उचलला नाही. यावेळी त्यांनी देरकर यांच्यावरही तोफ डागली. पाच वर्ष कधीही न दिसणारे नेते अचानक निवडणुकीच्या तोंडावर प्रकट होतात. मात्र, मतदार सुज्ञ आहे. ते सक्रिय निष्क्रीय उमेदवार बरोबर ओळखतात, असे ही ते म्हणाले. 

शेतक-यांसाठी पांदण रस्ते, हमी भाव, युवकांना व्यायामशाळा, बचत गटांना स्वयंपूर्ण बनवणे, भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, परिसरात नवीन उद्योग आणणे, गाव तिथे अभ्यासिका तयार करणे, मजबूत रस्ते बांधणे, शहर व मतदारसंघ प्रदूषणमुक्त करणे इत्यादी मतदारसंघासाठी व्हिजन असल्याचे खाडे यांनी सांगितले. सभेत बोलताना विश्वास नांदेकर यांनी देरकर यांच्यावर तोफ डागली. तर नरेंद्र ठाकरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी सोबत राहावे, असे आवाहन केले.   

रॅलीत वणी शहरासह ग्रामीण भागातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी पंजाचे, शिवसैनिक व हजारो समर्थक उपस्थित होते.