टॉप बातम्या

रेती वाटपात भेदभाव का, सर्व गट-ग्रामपंचायतला समान रेती पास मिळण्याची लाभार्थ्यांची मागणी.


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : 4 एप्रिल पासून घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटपाचा परत कार्यक्रम सुरु झाला. मात्र,एका ग्रामपंचायत तीन पास वाटप होत आहे. परंतु गट- ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या गावांना या रेती वाटपाचा चांगलाच फटका बसत असल्याची ओरड आहे. 

त्यामुळे ग्रामपंचायत व गट- ग्रामपंचायत मधील येणाऱ्या गावांनाही सामान रेती वाटपाचे पास मिळावे अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

परिणामी घाटावर रेती वाटपाचा कार्यक्रम सुरु असला परंतु गट ग्रामपंचायत मधील काही गावे किंबहुना लाभार्थी रेतीची वाट पाहतच राहतील आणि त्यांना रेती मिळण्यासाठी विलंब होईल अशी चिंताही व्यक्त होत आहे. यामुळे त्रस्त होऊन खाजगी लोकांच्या झटपट योजनेत पैशाची उधळण होईल असेही बोलल्या जात आहे.

तूर्तास रेती वाटप होत असलेल्या मोहिमेत घोळ होत असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे महसूल विभागाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचीही मागणी होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();