सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : आदिवासी टायगर सेना यांच्या वतीने कुवारा भिवसन देवस्थान, भीमगड (ता. पारशिवनी, जि. नागपूर) येथे बुधवार, दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी विदर्भ स्तरीय बैठक घेण्यात आली.विदर्भातील सर्व जिल्यातून महत्वाचे सामाजिक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. कुंवारा भिवसन चे पूजन करून बैठक सुरू करण्यात आली. बैठकीला संतोष कुळमेथे, माधुरी मडावी, मोरेश्वर उइके ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
बैठकीत विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले . चंद्रपूर जिल्ह्यात तीन दिवसीय राज्य अधिवेशन घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जल, जंगल, जमीन , शिक्षण, न्याय, हक्क, अधिकार हे स्लोगन लागू करण्यात करण्यात आले.
गाव तिथे शाखा सुरु करण्याचा निर्णय,तसेच अनेक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, माधुरी मडावी विदर्भ कार्याध्यक्ष ,मीनलताई आत्राम विदर्भ कार्याध्यक्ष, साईनाथ कोडापे विदर्भ महासचिव, मोरेश्वर उईके विदर्भ प्रवक्त्या,रमेश धुर्वे विदर्भ उपाध्यक्ष, प्रकाश कूमरे विदर्भ उपाध्यक्ष,वर्षा परचाके विदर्भ उपाध्यक्ष, नरेंद्र टेकाम विदर्भ संघटक, दशरथ कुलमेथे विदर्भ संघटक, शर्मिला कुंजाम विदर्भ संघटक, वर्षा आत्राम विदर्भ संघटक,अभिलाष परचाके विदर्भ युवा अध्यक्ष,प्रदीप कुळमेथे,गणेश कोवे,अमोल कुमरे,लहानू सालूरकर,अक्षय उईके,गजानन कुंभरे,शंकर नन्नावाडे,गणपत आडे,शिवराम धुर्व, रिता मडावी,वैशाली भालवे, बॉबी येलके, गायत्री येटे, संगीता सिडाम,रेखा सोरते,पूजा कूरसंगे, किशोर कोवे, नामदेव घोडाम,प्रभाकर मसराम,धनराज कातलाम,विश्वास कुमरे,भोजराज ईरपाचे,अशोक आडे,चरणदास मसराम,महिंद्र शेडमाके,विनोद सलामे,अंबादास मेश्राम,बंडू तोडसाम, राजेंद्र उईके,विश्वेशर मडावी, सीमा वाकडे, कालिदास नगराळे,प्रमोद सोयाम,बेबी उईके,संगीता येरकाडे,अर्चना उईके,वर्षा कुळमेथे,सुनील मेश्राम.राजेंद्द शेरकी,ललिता टेकाम, वैभव कुसनाके,सह विदर्भातील सर्व जिल्हा अध्यक्ष,जिल्हा महासचिव तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते बैठकीचे सूत्रसंचालक साईनाथ कोडापे तर आभार प्रदर्शन प्रकाश कुमरे ह्यांनी केले.