टॉप बातम्या

वणीतील ज्योती बार परिसरात मटका जुगारावर कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

संग्रहीत छायाचित्र 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील ज्योती बार परिसरात सुरू असलेल्या अवैध वरली मटका जुगारावर वणी पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6.05 वाजताच्या सुमारास ज्योती बारच्या बोळीत एक इसम लोकांकडून पैसे स्वीकारून वरली मटक्याचे आकडे लिहीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.

या कारवाईत आरोपी शेख इरफान शेख रज्जाक (वय 42, रा. पंचशिल नगर, वणी) व शेख फारूख शेख सलिम (वय 36, रा. पंचशिल नगर, वणी) यांना ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या ताब्यातून 960 रुपये रोख रक्कम, 1 ते 10 आकडे लिहिलेल्या वरली मटक्याच्या चिठ्ठ्या, कार्बनचा तुकडा व बॉलपेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) तसेच बीएनएस कलम 49 अन्वये वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शुभम मारोती महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();