टॉप बातम्या

मारेगावात घरफोडी; ३.३१ लाखांचा मुद्देमाल लंपास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : येथील वार्ड क्र. १४ येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोनं, चांदी व रोख रक्कम असा ३,३१,९९० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली.

फिर्यादी सुशिल दत्तात्रय जंगेवार (वय ४२) हे विविध कार्यकारी सहकारी संस्था, मारेगाव येथे ड्युटीवर गेले असताना घरातील पर्समध्ये ठेवलेले १५.५ तोळे सोनं, ९ तोळे चांदी व ११ हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. 

याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

एप्रिल मे महिना फुल लगन सराईचा असून सर्वत्र धामधूम व धावपळ सुरु असते. अशात एकाची हाक ऐकाला नसते. वरून उन्हाचा तडाखा. त्यामुळे अज्ञात चोरटे, अशा वेळेचा फायदा घेऊन घर साफ करतात. त्यामुळे शहरात प्रशासनाने विषेश लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे भावना व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();