टॉप बातम्या

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वरोरा :  उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबा आपण जन्माला आलात त्याला आज 135 वर्षे झालीत बाबासाहेब आजचे राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक शैक्षणिक प्रगती काय आहे. सत्तेच्या मोहासाठी स्वतः गहाण राहत आहे. राजकीय पक्ष केवळ आणि केवळ आपली खुर्ची बरी आणि पैसा या महापाही कोणत्याही स्तराला जाण्याचे स्पष्टपणे आज आपणास दिसून येते, पक्षाचे गोडवे गायले जात आहे त्यामुळे असे वाटते की हा भारत देश ना गुलाम बनेल की काय आजही मूठभर लोक बहुसंख्यांवर गुलामी लागत आहे 1भारतीय संविधान जगात सर्वोत्तम आहे ,,

अँटेनियो गुटेरस संयुक्त राष्ट्र संघ सरचिटणीस असे म्हणतात मी जगभरातील संविधान वाचले आहेत पण बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची कोणीही स्पर्धा करू शकत नाही.जगातील सर्व देशांनी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केल्यास अव्यय पाच वर्षात संपूर्ण जगातून गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी आणि दहशतवाद कायमचा संपुष्टात हे येईल. यावरून आपणास त्यांचे विचार हे केवळ भारतीयांनाच नाहीतर जगामध्ये भारताची घटना ही पावरफुल आहे. 

आज देशात गरिबी विरुद्ध श्रीमंती अशी असमानतेची दरी रुंदावत आहे बेरोजगारी तर हद्द ओलांडली आहे ल.साध्या पोलीस शिपाई पदासाठी एका जागेला 150 उमेदवार आहे यावरून बेकारीचा भस्मानाबाबत दिसून येतो आहे. 2 आजची राजकीय परिस्थिती मतदानाच्या माध्यमातून येथील जनता आपला प्रतिनिधी निवडून पाठवितो पण आज ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले त्या जनतेच्या समस्या काय आहे हे प्रतिनिधी जाणत नाही तर उलट समस्या निर्माण करतात त्यामुळे येथे जनतेला आजही मोर्चे आंदोलन करावे लागतात. लोकशाहीचा भूकंप होत आहे सर्वच पक्षांमध्ये आज राजकीय वारस मुख्य पदावर बसतो आहे. पक्षश्रेष्ठी त्याच कुटुंबातील व्यक्तीला पदावर बसवतो हे कुठली लोकशाही असे राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 सामाजिक स्थिती, समता हाच विचार केंद्रस्थानी ठेवून एक नवी सामाजिक स्थिती निर्माण होऊ शकते परंतु समाजात जातीय विषमता हे एक वेगळेच वास्तव आहे. जातीव्यवस्था पिढ्यान पिढ्या टिकवून ठेवणारी एक व्यवस्था तर समतेवर आधारित दुसरी म्हणून आज विषमता टिकून आहे. तिला आजचे पोषक असे वातावरण आहे. भगवान बुद्धाचा त्रिसूत्रांमध्ये शेवटचे सूक्त करुणा. करुणा म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून आपले हृदय हे लावून जाणे होय. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस भांडवलदार वर्ग हा वारे माप उद्योग उभारून गब्बर जगातील श्रीमंताच्या यादीमध्ये नावलौकिक करीत असताना येथील श्रमजीवी वर्ग आपल्या स्वतःच्या कष्टावर आपले कुटुंब पोहोचण्यासाठी दिवसेंदिवस अक्षम्य होतो आहे. 

समाजातील विषमता सामाजिक व आर्थिक गुलामगिरीमुळे आज देशात मजूर वर्ग वेठबिगार होतो आहे.आर्थिक विषमता कमी व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे असा त्यांचा आग्रह होता. कृषी उद्योगाला चालना देणे, शेतीची बी बियाणे, खते मापक दरात उपलब्ध करून देणे, पिकाची किंमत ठरविणे. परंतु असे होताना दिसत नाही म्हणून आज आर्थिक विषमतेचे डोम निर्माण झाले आहे. 

4 शैक्षणिक स्थिती देशातील प्रगतीचा मुख्य गाभाशिक्षण आहे. संविधानामध्ये शिक्षण मूलभूत हक्कांमध्ये अंतर्भूत केलेले असून वयाच्या 6 ते 14 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण केले आहे आणि ही केंद्र शासन व राज्य शासन यांची जबाबदारी आहे. पण आज आपणास काय दिसते प्राथमिक शिक्षणाची परिस्थिती अतिशय बिकट असून पटसंख्या अभावी शाळा बंद होत आहे. जिथे विद्यार्थी आहे तिथे शिक्षक नाही. शिक्षकावर इतर शैक्षणिक कामे आहे की तो आपल्या वर्गावर जाऊ शकत नाही. हा छुपा डाव अनेक वर्षापासून सुरू आहे. आज शिकणारे मुले शिक्षणाअभावी निरक्षर होतात की काय असे दिसायला येत आहे तर दुसरीकडे प्रोढाचे नाव साक्षर परीक्षा लागून भारत आपली प्रतिष्ठा आम्ही कसे शंभर टक्के साक्षर आहोत हे दाखवण्याचा केवल आणि प्रयोग करीत आहे. वरील सर्व गोष्टी संविधाना निर्मात्याला अपेक्षित होत्या का एवढ्या कष्टाने संविधान तयार केले परंतु लागू झाल्यापासून अंमलबजावणी योग्य दिशेने होत नाही आणि म्हणून भारताची शैक्षणिक स्थिती ही आजही फार चांगली दिसत नाही.
-हरिभाऊ दारुंडे, वरोरा जि.चंद्रपूर 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();