टॉप बातम्या

गॅस टंचाई व महागाई विरोधात वंचितचे तहसीलदारांना निवेदन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगावघरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा व वाढत्या महागाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मारेगाव येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्पष्ट आदेशाचे पालन करत राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन सादर करण्यात आले. गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वयंपाकासाठी अडचणी निर्माण होत असून प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच गॅस पुरवठा सुरळीत करावा व टंचाई दूर करावी, ही मुख्य मागणी जर शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर यापेक्षाही अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर, मारेगांव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मून, कार्याध्यक्ष अनिल खैरे, मारेगाव शहराध्यक्ष अनंता खाडे, कार्याध्यक्ष रवींद्र तेलंग, महासचिव विनेश मेश्राम, महिला शहर अध्यक्ष रेखा काटकर, महासचिव शीतल तेलंग, पुष्पा ताकसांडे, निळावती मुन, गोरखनाथ पाटील, धनराज मून, प्राणशील पाटील, अमरनाथ तेलतुंबडे, गौतम मालखेडे, डोमाजी हस्ते, यशवंत पाटील, हंसराज पाटील महादेव पाटील, व्ही एल फुलझले, अनिल महाकुलकार, शांताबाई किन्हेकर, अंजली टेकाम, सविता आत्राम, राजू बलकी, अविनाश कन्नलवार, जुगल आत्राम, हर्षद पाटील यांचे सह मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगांव शाखेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();